Classic Shelf
युवतीमना !
युवतीमना !
Couldn't load pickup availability
About the Book
‘युवतीमना’ या पुस्तकात स्त्रियांच्या भावविश्वाचा वेध घेणाऱ्या चार सुंदर आणि मनाला स्पर्शून जाणाऱ्या कथा आहेत. एका तरुण मुलीच्या कॉलेज जीवनातील प्रेमकथे पासून ते एका स्वतंत्र स्त्रीच्या, तिच्या घटस्फोटानंतर स्वतःला सावरत पुढे जाण्याच्या, प्रवासापर्यंत. प्रत्येक कथेत स्त्रियांच्या भावना, संघर्ष आणि अनुभवांचे हृदयस्पर्शी चित्रण आहे.‘युवतीमना’ या शब्दाचा अर्थच आहे ‘स्त्रीचे मन, स्त्रीच्या भावना’. प्रत्येक स्त्री वेगळी असली, तिचा प्रवास वेगळा असला तरी काही भावना विशेषतः ‘प्रेम’ सर्वत्र समान असतात. या पुस्तकातील कथा त्या सार्वत्रिक भावनांना अचूकतेने, सखोलतेने आणि अत्यंत सहजतेने मांडतात.प्रत्येक कथा प्रेमाच्या एका वेगळ्या छटेला उजाळा देते. कधी कोवळं, कधी तीव्र, कधी शांत, तर कधी वेदनादायक. त्यामुळे हे पुस्तक वाचकाला भावनिकदृष्ट्या जोडून ठेवतं आणि शेवटपर्यंत गुंतवून ठेवतं.‘युवतीमना’ हे सर्व वयोगटातील वाचकांसाठी आनंददायी, हृदयाला भिडणारं आणि मनात ठसा उमटवणारं पुस्तक आहे.
About the Author
‘युवतीमना’ हे वल्लरी मानवी यांचे पहिले पुस्तक आहे. मुंबईतील संस्कृती समृद्ध आणि वाचन प्रेमी वातावरणात वाढलेल्या वल्लरीला लहानपणापासूनच मराठी साहित्याची ओढ होती. शाळेत असतानाच तिने कथा लिहायला सुरुवात केली. IT क्षेत्रात काम करत असतानाही तिने आपल्या लेखनाची आवड जपली. तिच्या कथा स्त्रियांच्या भावना, अनुभव आणि त्यांच्या अंतर्मनातील जग संवेदनशीलपणे मांडतात. ‘युवतीमना’ हे तिच्या साहित्यप्रेमाचे आणि विविध पात्रांना जिवंत करण्याच्या इच्छेचे सुंदर प्रतिबिंब आहे.
Share
