Skip to product information
1 of 1

Classic Shelf

Lal Ded – Kashmirchi Aai | लल देद-काश्मीरची आई

Lal Ded – Kashmirchi Aai | लल देद-काश्मीरची आई

Regular price Rs. 424.00
Regular price Sale price Rs. 424.00
Sale Sold out
Quantity

About The Book

लेखिका डॉ. वैदेही तामण आपल्याला घेऊन जातात चौदाव्या शतकातील काश्मीरमध्ये- लल देदच्या काळात, तिच्या वाखांच्या विश्वात, तिच्या भक्तीत, तिच्या वेदनेतून उमललेल्या आत्मज्ञानाच्या प्रवासात.

'लल देद : काश्मीरची आई' हे केवळ एका संतकवयित्लीचे चरित्न नाही; हा सहाशे वर्षांहून अधिक काळ मागे नेणारा एक जिवंत आध्यात्मिक प्रवास आहे. लल देदच्या पावलांचे ठसे शोधत, तिच्या वाखांमधील शब्दांच्या पलीकडचा अर्थ उलगडत आणि काश्मीरच्या मातीमध्ये जपल्या गेलेल्या तिच्या स्मृतींना स्पर्श करत डॉ. वैदेही तामण वाचकाला त्या काळात घेऊन जातात, जिथे एका स्त्रीने रुढी, कर्मकांड, सामाजिक बेधने आणि बाह्य ओळखींच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या अंतरात्म्याचा शोध घेतला.

या लेखनातून डॉ. वैदेही तामण यांनी लल देदच्या भक्तीच्या प्रवासाकडे केवळ काश्मीरच्या आध्यात्मिक परंपरेच्या संदर्भात पाहिले नाही, तर महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेशीही त्याचा एक सुंदर अंतःसंबंच उलगडला आहे. लल देदच्या आत्मशोधाच्या वाटेवर आणि संत मुक्ताबाईंच्या भक्ती, आत्मज्ञान व अंतर्मुखतेच्या प्रवासात जाणवणारे साम्य त्यांनी आपल्या लेखणीतून संवेदनशीलपणे मांडले आहे. काश्मीरची लल देद आणि महाराष्ट्राची मुक्ताबाई- दोन भिन्न प्रदेश, दोन वेगळे काळ आणि दोन स्वतंत्न आध्यात्मिक वाटा; तरीही अंतर्मनातील सत्याचा शोध, देहाच्या पलीकडील आत्मबोध आणि भक्तीतून मुक्तीकडे जाणारी दिशा या दोघींना एका अदृश्य आध्यात्मिक धाग्याने जोडते.

लल देदच्या आयुष्यातील वेदना, तिची साधना, तिचे प्रश्न, तिचा निर्भीड स्वर आणि तिच्या वाखांमधून प्रकटणारे शिवतत्त्व-या सगळ्याचा शोध घेताना लेखिका केवळ इतिहास सांगत नाहीत, तर वाचकाला त्या काळाचा अनुभव देतात.

काश्मीरच्या गावांमधून, प्राचीन वाटांमधून, लोकस्मृतीतून आणि आजही उच्चारल्या जाणाऱ्या वाखांमधून लेखिकेने लल देदचा शोध घेतला आहे. हा शोध शेवटी एका स्त्रीचा इतिहास शोधण्यापुरता राहत नाही; तो भक्ती, आत्मज्ञान आणि स्वतःच्या अस्तित्वाचा अर्थ शोधण्याचा प्रवास बनतो.

हा प्रवास लल देदचा आहे, पण तो प्रत्येक त्या माणसाचाही आहे जो कधीतरी स्वतःला विचारतो- 'मी कोण?'

'लल देदः काश्मीरची आई' चौदाव्या शतकातील काश्मीरपासून महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेपर्यंत, लल देदपासून मुक्ताबाईपर्यंत आणि बाह्य जगापासून अंतर्मनापर्यंत घेऊन जाणारा एक विलक्षण आध्यात्मिक साहित्यप्रवास.

About The Author 

डॉ. वैदेही तामण या महाराष्ट्र शासनमान्य पलकार, लेखिका, संशोधक आणि काश्मीरच्या प्राचीन वारशाच्या अभ्यासक आहेत.

काश्मीर खोऱ्यात दीर्घकाळ वास्तव्य करून तेथील प्राचीन इतिहास, तत्त्वज्ञान, संतपरंपरा, साहित्य आणि आध्यात्मिक वारशावर व्यापक संशोधन करणाऱ्या भारतातील पहिल्या पत्नकार म्हणून त्यांची स्वतंल ओळख निर्माण झाली आहे.

लल देद, अभिनवगुप्त, नंद ऋषी, बिल्हण, नीलमत पुराण तसेच काश्मीरच्या प्रभावशाली स्त्रीपरपरेवर त्यांनी विपुल लेखन केले आहे.

त्या मुंबईतील इंग्रजी दैनिक Afternoon Voice आणि डिजिटल न्यूज व यूट्यूब व्यासपीठ The Democracy News च्या ग्रुप एडिटर आहेत.

दोन दशकांहून अधिक काळाच्या पत्नकारितेत त्यांनी स्वतंत्र पत्रकारिता, संशोधन आणि लेखनाचा स्वतःचा ठसा उमटवला आहे. त्या नवोदित पत्नकारांसाठी व्यावसायिक प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत असून, नव्या पिढीला सक्षम पत्त्रकारितेसाठी घडवत आहेत.

View full details